शारीरीक चाचणी ही पुरुषांसाठी व महीलासाठी 50 गूणाची असते. या परीक्षेत 50% कीमान गुण उत्तिर्ण होण्यासाठी मिळवणे आवश्यक असते.
पुरुष पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचण्या
पुरूषासाठी शारीरीक चाचणी (50 गुणांची विभागणी)
1) 1600 मीटर धावणे – 30 गुण
2) 100 मीटर धावणे – 10 गुण
3) गोळाफेक – 10 गुण
उमेदवारांनी वर दिलेल्या प्रकारांचा (शाररीक चाचणीमधील) काळजी पूर्वक सराव करून त्यात चांगले गुण मिळवावे.
शारीरिक चाचणी मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी चांगल्या शारीरिक कवायती शिक्षकांचे/ चांगल्या खेळाडूंचे मार्गदर्शन नक्की घ्यावे. किमान एक किंवा दिड महिना अगोदर शारीरिक चाचणी ची तयारी सुरू करावी. सराव करताना वेळ, अंतर यांच्या नोंदी ठेवत जाव्या व त्यात सुधारणा करत जावे. फक्त सकाळी किंवा संध्याकाळी च हे श्रम करू नये कारण शारीरिक चाचणी ची परीक्षा बहुदा दुपारीच असते, त्यासाठी दुपारची ही तयारी करावी.
आपल्या शारीरिक क्षमतांची नोंदी कायम ठेवाव्यात. दुपारच्या वेळी धावणे, अडथळे पार करणे, लांब उडी, गोळा फेक व इतर शारीरिक कवायती यांची प्रॅक्टिस नियमित करावी आणि लागणारा वेळ सुधारावा. स्टैमीना सुधारावा.
दिवसातील तीनही वेळात (सकाळ, दुपार, सायंकाळ) शाररीक चाचणीची तयारी (सराव) करावी. अशी तयारी करण्यासाठी शाळेचे मैदान, क्रिडा मैदान, रनिंग ट्रॅक किंवा पोलीस मैदानाचा वापर करावा व तेथे जरुर ते मार्गदर्शन घ्यावे.
ग्रामीण भागात उमेदवाराना अशी मैदाने उपलब्ध होत नाहीत यासाठी त्यानी आपल्या गावाजवळचा रस्ता व तेथे अंतर मोजुन घडयाळाची वेळ लावुन सराव करावा. शक्य असल्यास उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या अगोदर एक ते दोन दिवस जिल्हा पोलीस मैदानावर जाऊन सराव करावा. तेथे पोलीस कवायत /प्रशिक्षक त्यांना सरावाचे वेळी मार्गदर्शन करण्यास उपलब्ध असतात. या संधीचा लाभ सर्व उमेदवारांनी
घेतल्यास चांगले/अधिक गुण मिळविता येतात.
1) पुरुष उमेदवार 1600 मी. धावणे – गुण 30
अंतर मिळणारे गुण-
•5 मि. 10 सेकद किंवा त्यापेक्षा कमी- 30 गुण
•5 मि. 10 सेकद किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 5 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षाा कमी –27 गुण
•5 मि. 30 सेकंद पेक्षा जास्त परंतु 5 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी –24 गुण
•5 मि. 50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 6 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी –21 गुण
•6 मि. 10 सेकंद पेक्षा जास्त परंतु 6 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 18 गुण
•6 मि. 30 सेकंद पेक्षा जास्त परंतु 6 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 15 गुण
•6 मि. 50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 7 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 10 गुण
•7 मि. 10 सेकंद पेक्षा जास्त परंतु 7 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 05 गुण
•7 मि. 30 सेकंद जास्त – 00 गुण
2) 100 मीटर धावणे (10 गुण) –
या प्रकारात जास्त गण मिळविण्यासाठी शर्यतीच्या सरुवातीला वेगवान सरुवात (Bullet Start) करणे, शर्यतीच्या अंतिम टप्यांत वेग कमी न करणे, पळताना हात जोरात स्विंग करणे, तसेच मागे अथवा इकडे तिकडे न पाहणे – हे आवश्यक आहे. धाव पुर्ण होताच न चुकता परीक्षकांकडे जाऊन आपली वेळ अचुक नोंदविली आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. अचुक वेळ तपासण्यासाठी स्टॉप वॉच लावुन दररोज सराव करावा.
उमेदवारास दुपारीही भर उन्हात धावण्याची चाचणी द्यावी लागते. त्यामुळे उमेदवारांनी केवळ सकाळी किंवा सायंकाळीच धावण्याचा सराव करु नये. भर उन्हातील सराव उमेदवारांना चाचणीच्यावेळी फयद्याचा ठरतो.
अंतर मिळणारे गुण
•11.50 सेकंद किंवा त्या पेक्षा कमी- 10 गुण
•11.50 सेकदा पेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंदापेक्षा कमी- 09 गुण
•12.50 सेकदा पेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंदापेक्षा कमी- 08 गुण
•13.50 सेकदा पेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंदापेक्षा कमी- 07 गुण
•14.50 सेकदा पेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंदापेक्षा कमी- 05 गुण
•15.50 सेकदा पेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंदापेक्षा कमी- 03 गुण
•16.50 सेकदा पेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंदापेक्षा कमी- 01 गुण
•17.50 सेकंदापेक्षा जास्त- 00 गुण
3) गोळाफक (10 गुण) –
उमेदवार जेवढे लांब अंतर फेकतो त्या प्रमाणात त्याला गुण दिले जातात. कमी अंतरावर गोळा फेकणा-यास कमी गुण मिळतात. या प्रकारात 10 पैकी 10 गुण मिळविण्यासाठी 8.50 मीटर लांब गोळा फेकला पाहीजे. Pत्यानंतरच्या प्रत्येक 50 से.मी. कमी लांब फेकणा-यास 1 गुण कमी होतात. याबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे-
गोळा फकलेले अंतर व मिळणारे गुण
•8.50 मीटर किंवा जास्त- 10 गुण
•7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटर पेक्षा कमी – 09 गुण
•7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटर पेक्षा कमी- 08 गुण
•6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 मीटर पेक्षा कमी- 07 गुण
•6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटर पेक्षा कमी- 06 गुण
•5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटर पेक्षा कमी- 05 गुण
•4.90 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटर पेक्षा कमी- 04 गुण
•4.30 मीटर किंवा जास्त परंतु 4.90 मीटर पेक्षा कमी- 03 गुण
•3.70 मीटर किंवा जास्त परंतु 4.30 मीटर पेक्षा कमी- 02 गुण
•3.10 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटर पेक्षा कमी- 01 गुण
•3.10 मीटर पेक्षा कमी- 00 गुण
गोळाफेक मध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी सराव महत्वाचा आहे. परुष उमेदवारांसाठी गोळ्याचे वजन 7.260 कि.ग्राम. असते. हा गोळा खेळाचे साहित्य मिळणार्या कोणत्याही दुकानात माफक किमतीला उपलब्ध असतो. गोळाफेकीमध्ये हात व शरीराचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी किमान सरुवातीला तरी तज्ञ मार्गदर्शकाची जरूरी आहे. गोळाफेक दिलेल्या वर्तुळातुनच करावी लागते. त्या वर्तुळास अथवा वर्तुळाबाहेर पाऊल पडल्यास फाऊल दिला जातो व गुण मिळत नाहीत.
महिला पोलीस शिपाई भरती
शारीरिक चाचणी – 50 गुण (किमान गुण 50%)
महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असते. यामध्ये किमान 50% गुण उत्तीर्ण होण्यासाठी मिळविणे आवश्यक आहे. शारीरीक चाचणीच्या गुणांची विभागणी खालील प्रकारे करण्यात आली आहे.
1) 800 मीटर धावणे – 30 गुण
2) 100 मीटर धावणे – 10 गुण
3) लांब उडी – 10 गुण
वरील शारीरीक चाचणीची तयारी करताना महिला/मुलींनी विशेष असा तंत्रशुद्ध व अंतरवेळेची अचुक नोंद करुन सराव केलेला नसल्याने बहुतांश महिला/मुली शारीरीक चाचणीमध्येच अयशस्वी होतात व महिला पोलीस होण्यासाठी मनात बाळगलेली त्यांची इच्छा/आशा इत्यादीची निराशा होते.
1) महिला उमेदवार 800 मी. धावणे – गुण 30
अंतर व मिळणारे गुण
•2 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 30 गुण
•2 मि. 50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 3 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 27 गुण
•3 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3 मि .10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 24 गुण
•3 मि.10 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3 मि.20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 21 गुण
•3 मि.20 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3 मि .30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 18 गुण
•3मि .30 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3 मि .40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 15 गुण
•3 मि.40 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3 मि .50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 10 गुण
•3 मि.50 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 4 मि .00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 05 गुण
•4 मि .00 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त- 00 गुण
2) 100 मीटर धावणे (10 गुण) –
सर्वात कमी कष्टांत परंतुत सततच्या सरावानंतर या प्रकारात चांगले गुण मिळण्याची संधी असते. यासाठी अंतर व वेळ याची अचुक नोंद सरावाचे वेळी करण्याची आवश्यकता आहे.
अंतर व मिळणारे गुण
•14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी- 10 गुण
•14 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 15 सेकंद पेक्षा कमी- 09 गुण
•15 सेकंद पेक्षा जास्त परंतु 16 सेकंद पेक्षा कमी- 08 गुण
•16 सेकंद पेक्षा जास्त परंतु 17 सेकंद पेक्षा कमी- 07 गुण
•17 सेकंद पेक्षा जास्त परंतु 18 सेकंद पेक्षा कमी- 05 गुण
•18 सेकंद पेक्षा जास्त परंतु 19 सेकंद पेक्षा कमी- 03 गुण
•19 सेकंद पेक्षा जास्त परंतु 20 सेकंद पेक्षा कमी- 01 गुण
•20 सेकंद पेक्षा जास्त- 00 गुण
3) गोळा फेक (10 गुण) –
10 पैकी 10 गुण मिळविण्यासाठी 4 कि.ग्राम (8 पौंड)
वजनाचा गोळा किमान 6 मीटर लांब फेकणे आवश्यक आहे. त्यानंतरच्या प्रत्येकी 1/2 मीटर कमी लांब अंतरासाठी ठराविक गुण कमी होतात. 4 मीटरपेक्षा कमी लांब गोळा फेकल्यास शुण्य गुण मिळतात.
गोळाफेकीचा सराव हा हायस्कुलमधील/कॉलेजमधील शारीरीक शिक्षक यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली विशेष रेषातंत्राने फेकणयाचा दररोज सराव करणयाची गरज आहे.
गोळा फकलेले अंतर व मिळणारे गुण
•6.00 मीटर किंवा जास्त – 10 गुण
•5.50 मीटरपेक्षा जास्त परंतु 6.00 मीटरपेक्षा कमी- 08 गुण
•5.00 मीटरपेक्षा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी- 06 गुण
•4.50 मीटरपेक्षा जास्त परंतु 5.00 मीटरपेक्षा कमी- 04 गुण
•4.00 मीटरपेक्षा जास्त परंतु 4.50 मीटरपेक्षा कमी – 02 गुण
•4.50 मीटरपेक्षा कमी – 00 गुण.
2) लेखी परीक्षा
अभ्यासक्रम व गुण विभागणी
अ) अंकगणित : 20 गुण
ब) सामान्यज्ञान व चालु घडामोडी : 20 गुण
क) बुध्दीमापन चाचणी : 20 गुण
ड) मराठी व्याकरण : 20 गुण
ई) मोटर वाहन चालविणे : 20 गुण
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत वरील अभ्यासक्रमावर एकच प्रश्नपत्रिका असते. उमेदवारांना लेखी परीक्षा मराठी भाषेतून देता येते. ही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पध्दतीची असते.
1) अंकगणित (20 गुण) –
पोलिस भरती पदासाठी एकूण 20 गुणांचे साधे अंकगणित असते. त्याचे उपविषय याप्रमाणे असतात.
1) बेरीज, वजाबाकी
2) भागाकार, गुणाकार
3) व्याज
4) सरासरी
5) टक्केवारी
6) नफा-तोटा
7) अपुर्णांक
8) ल.सा.वि./म.सा.वि.
9) वर्गमुळ
10) प्रमाण
11) सोपी गणिते
2) सामान्यज्ञान व चालु घडामोडी (20 गुण) –
लेखी चाचणीत 100 पैकी 20 गुण सामाण्यज्ञाना संबंधी असतात. सामाण्यज्ञान दहावी पातळीचे असते. जिल्हा पोलिस भरतीशी संबिधत सामाणयज्ञान या विषयाची तयारी करीत असताना जिल्हा, महाराष्ट्र, भारत अशा पध्तीने अभ्यास करावा. यामध्ये महत्वाच्या देशाच्या राजधाण्या, भारतातील एकण राज्यांची संख्या, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, भारतातील मोठे प्रकल्प, महत्वाची ठिकाणे, ऐतिहासिक शहरे, प्रसिद्ध व नामांकित व्यक्ती, महत्वाचे दिनविशेष, क्रीडा प्रकार, सन्मान याबाबत मािहती विचारली जाते.
महाराष्ट्र राज्यासंबंधी भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, वैज्ञानिकनक, राजकीय, क्रीडासंबंधी पुरस्कारकार, प्रसिद्ध शहरे, प्रसिद्ध व्यक्ती, महत्वाची उत्पादने , महत्वाचे कारखाने, प्रकल्प इ. संबंधी माहिती विचारली जाते. आपापल्या जिल्हांचे सखोल ज्ञान माहितीसाठी इयत्ता तिसरीचे ‘आपला जिल्हा व महाराष्ट्र राज्यासंबंधी ज्ञान मिळविण्यासाठी इयत्ता चौथीचे ‘आपला महाराष्ट्र’ या पुस्तकांचे वाचन करावे. सामान्यज्ञान हे विविध विषयांवरील ज्ञान आहे व ते अगाट आहे व त्यामध्ये दिवसें दिवस नवीन माहितीची भर पडत आहे. वर्तमानपत्रांच्या वाचनातून नवीन माहिती उपलब्ध होते. त्याचे टिपण्णी नोंदवहीत करावे.
परदेशातील, देशातील, महाराष्ट्र राज्यासंबंधी व आपापल्या जिल्हांचे महत्वाच्या व उल्लेखनीय अशा विविध क्षेत्रांतील, घटनांची माहिती एका वाक्यात उत्रे देणयासाठी विचारली जाते. क्रिडाक्षेत्र, विविध पुरस्कार, सन्मान, नवीन नियुक्त्या, विज्ञान विषयक ठळक घटना, राजकिय, सामाजिक, प्रासंगिक ठळक घटनांबाबतचे प्रश्न विचारले जातात. चालु घडामोडी या विषयात उमेदवारांनी वर्षभराच्या चालु घडामोडी समोर ठेवणे आवश्यक आहे. उमेदवाराचा बारावीचा स्तर लक्षात घेऊनच चालु घडामोडी विचारल्या जातात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र राज्यासंबंधी आणि भारत देश यांवर चालु घडामोडीचे लक्ष केंद्रीत केलेले असते. विशेषत: महाराष्ट्र राज्यासंबंधी चालु घडामोडींचा अभ्यास अधिक करावा. त्यातही अलीकडच्या चालु घडामोडी यांवर अधिक लक्ष द्यावे. या चाचणीत उमेदवाराना भरपूर गुण मिळवून देऊ शकतात. अशा त-हेने एखादा उमेदवार अंकगणित आणि चालु घडामोडी या दोन विषयात भरपूर गुण प्राप्त करु शकतो,
3) बुद्धीमापन चाचणी (20 गुण) – या घटकावरील हे प्रश्न चौथी, सातवी, MTSE किंवा MPSC MPSM या परीक्षेतील प्रश्नांसारखे असतात. यात – संख्या व वर्ण मालिका, सांकेतिक भाषा, कुट प्रश्न, आक्रृत्यांवरील प्रश्न, बैठक, दिशा, कालमापन, वय आणि क्रमांवरील प्रश्न, तर्कक्षमतेवरील प्रश्न – यांसारखे घटक असतात. सरावाने या विषयांत पैकीच्या पैकी गुण पाडता येतात.
4) मराठी व्याकरण (20 गुण) – या घटकावरील 25 प्रश्न हे पढील मद्यांवर असतात- वर्ण, शब्दांच्या जाती, संधी, समास, वाक्यरचना, लिंग, वचन, विभक्ती, शब्दसंग्रह, म्हणी-वाक्यप्रचार, इत्यादी.
5) मोटर वाहन चालविणे/ वाहतकीचे नियम (20 गुण) –
टीप- नव्या नियमांत काही बदल ही होऊ शकतो त्याची एकदा खात्री करून घ्यावी.
अशाच माहिती साठी आणि नोकरी च्या जाहिराती साठी आमचे टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका….. तिथे रोज नवनवीन जाहिराती प्रकाशित होत असता.



Leave a Reply